हरदाेली (राजा) ठरले हाॅटस्पाॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:26+5:302021-04-13T04:08:26+5:30
कुही : तालुक्यातील हरदाेली (राजा) येथे काेराेना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हाेत असून, सध्या येथील प्रत्येक घरात काेराेनाचे रुग्ण आढळून ...

हरदाेली (राजा) ठरले हाॅटस्पाॅट
कुही : तालुक्यातील हरदाेली (राजा) येथे काेराेना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हाेत असून, सध्या येथील प्रत्येक घरात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे या गावाला ‘हाॅटस्पाॅट’ घाेषित करण्यात आले असून, संक्रमण राेखण्यासाठी या गावाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाययाेजना म्हणून गावाच्या सॅनिटायझेशनवर भर दिला जात आहे.
हरदाेली (राजा) हे गाव मांढळपासून चार किमी असून, गावाची लाेकसंख्या २,५०० व्या आसपास आहे. ४०० घरांची वस्ती असलेल्या या गावात आजमितीस प्रत्येक घरात काेराेना संक्रमित रुग्ण आहे. त्यामुळे प्रशासनाने हे गाव ‘हाॅटस्पाॅट’ म्हणून घाेषित केले असून, ते तालुक्यातील पहिले ‘हाॅटस्पाॅट’ गाव ठरले आहे. गावातील बहुतांश रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. गावाचे सॅनिटायझेशन केले जात असून, रुग्णांवर याेग्य औषधाेपचार केला जात माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम यांनी दिली.
तालुक्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून, विविध उपाययाेजना करायला सुरुवात केली आहे. गावात ४५ वर्षावरील नागरिकांना मनात भीती न बाळगता काेराेना लसीकरण करवून घ्यावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व लाेकप्रतिनिधी जनजागृती करीत आहेत. तालुक्यात राेज किमान १,५०० नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याचे तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय निकम यांनी सांगितले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी पर्वणी हर्षा पाटील, तहसीलदार (प्रभारी) रमेश पागोटे, खंडविकास अधिकारी मनोज हिरूडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम, कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने, वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज, देवाजी सडमेक, सुहास मिसाळ, हिंदलाल उके यांनी हरदाेली (राजा) व इतर संक्रमित गावांना भेटी देत तेथील उपाययाेजनांची पाहणी केली. शिवाय, अधिकाऱ्यांनी काेराेना संक्रमण राेखण्यासाठी काही सूचनाही केल्या.
...
आठ दिवसांचा लाॅकडाऊन
कुही तालुक्यात राेज १०० पेक्षा अधिक नागरिक काेराेना पाॅझिटिव्ह येत आहेत. त्यातच मृत्यूचा दरही वाढत चालला आहे. ही काेराेना संक्रमण साखळी ताेडण्यासाठी तालुक्यात आठ दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हरदाेली (राजा) साेबतच कुही तालुक्यातील मांढळ, वेलतूर, सोनपुरी, हरदोली (नाईक) येथेही काेराेना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मांढळची ‘हाॅटस्पाॅट’कडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यातच लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने नवी समस्या निर्माण झाली आहे.