शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय; अजित पवारांची मिश्कील टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 10:31 IST

Winter Session Maharashtra 2022 : तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले.

नागपूर : राज्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू असून सत्ताधारी-विरोधकांकडून विविध मुद्दयांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांचा वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना, हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये... मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय अशी मिश्कील टीका विधान सेभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला. मी एकच दौरा केला तर माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली. 'अजितदादा कधी रडतात तर कधी ८-८ दिवस फोन बंद करून पळून जातात. दादांना नेहमी क्रिम पोस्ट मिळत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधीपक्ष नेते हे योग्य नाही. त्यांच्या जागी जयंत पाटील याना संधी मिळयला हवी होती,' असा टोला त्यांनी लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली.

तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावात सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांवर करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात, मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात, भ्रष्टाचार, महिला सुसक्षा या विषयांचा समाविष्ट असेल, असंही त्यांनी सांगितलं.

कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे

अब्दुल सत्तार हे दोषी आहेत. कुठल्या कालावधीत त्यांनी भ्रष्टचार केला होता, उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क देणे गौण आहे. प्रकरण लक्षात आल्यानंतर विरोधकांचे कामच आहे सभागृहात उचलण्याचे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAjit Pawarअजित पवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारण