अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:53+5:302021-03-04T04:13:53+5:30
त्याचप्रकारे २७ वर्षीय संजय ओमप्रकाश येडे हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. त्याने बाईकवर तिचा पाठलाग करून ...

अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडखानी
त्याचप्रकारे २७ वर्षीय संजय ओमप्रकाश येडे हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. त्याने बाईकवर तिचा पाठलाग करून छेड काढली. मुलीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यांनी कोराडी पोलिसात तक्रार दाखल केली.
------------------------
महिलेची चेन स्नॅचिंग
नागपूर : रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेचे ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बाईकवर आलेल्या दोन युवकांनी बळजबरीने हिसकावून नेले. ही घटना शिवशक्तीनगर येथे घडली. पुष्पा उपाध्याय या मंगळवारी आपल्या दिराच्या पत्नीसोबत किराणा दुकानात जात होत्या. त्यावेळी ही घटना घडली.
-----------------------
नाश्ता विक्रेता महिलेस मारहाण
नागपूर : नाश्ता विक्रेता महिलेला एका दारुड्याने मारहाण केली. ३२ वर्षीय महिला मानकापूर पोलीस ठाणे परिसरात नाश्त्याचा ठेला लावते. सोमवारी रात्री हेमंत दत्ता मेश्राम (३२) रा. ओमनगर हा महिलेच्या ठेल्यावर आला. नशेत असल्याने तो आपत्तीजनक व्यवहार करू लागला. महिलेने त्याला फटकारत तेथून जाण्यास सांगितले. यानंतर हेमंत बळजबरीने महिलेच्या घरी आला आणि तिला मारहाण केली. महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.