अल्पवयीन मुलीची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:07 IST2021-09-03T04:07:37+5:302021-09-03T04:07:37+5:30

नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रेष्ठ अशोक यादव ...

Harassment of a minor girl | अल्पवयीन मुलीची छेडखानी

अल्पवयीन मुलीची छेडखानी

नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रेष्ठ अशोक यादव (१९) असे आरोपीचे नाव आहे. श्रेष्ठने ३१ ऑगस्टला सायंकाळी १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. अल्पवयीन विद्यार्थिनीने याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिने कुटुंबीयांसह जरीपटका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी छेडखानी, पोक्सो ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

..............

एफसीआय गार्डचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नागपूर : विजेचा धक्का लागल्यामुळे फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफसीआय) गोदामातील सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. राकेश श्रीवास (३६) रा. नवनाथनगर असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते ४ जुलैला दुपारी धंतोलीतील एफसीआय गोदामात काम करीत होते. दरम्यान, त्यांना विजेचा धक्का लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

............

Web Title: Harassment of a minor girl