---------------
वैमनस्यातून जीवघेणा हल्ला
नागपूर : जुन्या वैमनस्यातून हुडकेश्वरमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवासी सोनु छबिलाल थापा (१५) आपला मित्र आतिफ शेख सोबत गुरुवारी रात्री बेसा चौकातून जात होता. त्यावेळी सोनु शेख बशीर ऊर्फ डीजेवाला आणि इतर दोघांनी जुन्या वैमनस्यातून सोनुवर हल्ला केला. उलट्या चाकूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------
कोराडीतील पिऱ्या तडीपार
नागपूर : कोराडीतील गुन्हेगार पिऱ्या ऊर्फ फिरोज लालु बादलेकर यांस झोन पाचच्या पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. पिऱ्या विरुद्ध जमीन हडपणे, हल्ला करणे, लुटमार, जुगार आदी गुन्हे दाखल आहेत. त्याची कोराडी ठाण्याच्या परिसरात दहशत आहे. त्यामुळे त्यास तडीपार करून चंद्रपूरला सोडण्यात आले आहे.
.............