Maharashtra CM; उपराजधानीसह विदर्भात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:24 IST2019-11-23T10:22:00+5:302019-11-23T12:24:57+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

Maharashtra CM; उपराजधानीसह विदर्भात जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. नवनियुक्त महापौर संदीप जोशी यांच्या उपस्थितीत आठ रस्ता परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
अनपेक्षितपणे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचे वृत्त धडकताच गडचिरोली मधील इंदिरा गांधी चौकात तसेच चामोर्शी येथे भाजप आमदार डॉ.देवराव होळी यांच्या घरासमोर, देसाईगंजमध्ये आमदार कृष्णा गजबे यांच्या कार्यालयासमोर आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. याशिवाय काही तालुकास्थळीही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.