शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगत होता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:54 IST

तिला उचलून खुर्चीवर बसवलं आणि घराबाहेर आणलं तेव्हा तिने आनंदाने काढलेला आवाज आणि आईकडे पाहून जेवढा शक्य असेल तेवढा उंचावलेला हात हा तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे सांगत होता.. तिच्या चेहऱ्यावरची निर्मळता आणि हास्यामधली निखळता सोडून बाकी काहीच महत्त्वाचं नव्हतं.

ठळक मुद्देतिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगत होता...व्हीलचेअरवरून ती आता पाहू शकते बाहेरचं जग..

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: तिला उचलून खुर्चीवर बसवलं आणि घराबाहेर आणलं तेव्हा तिने आनंदाने काढलेला आवाज आणि आईकडे पाहून जेवढा शक्य असेल तेवढा उंचावलेला हात हा तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे सांगत होता.. तिच्या चेहऱ्यावरची निर्मळता आणि हास्यामधली निखळता सोडून बाकी काहीच महत्त्वाचं नव्हतं.नेहा आझाद सिंग. वय वर्षे १८. राहणार मिहानमधील एका पुलाखालच्या पत्र्याच्या खोपट्यात. आईवडील मजूर.गेली १८ वर्षे अंथरुणावरच असलेली ही मुलगी आज एका व्हील चेअरवर बसून घराबाहेरचे जग पाहत होती. ती आज एका अर्थाने स्वतंत्ररित्या उभी होती..नेहा जन्मत:च विशेष अपत्य होती. तिची जुळी बहीण ही सामान्य अपत्य आहे. त्यांचे आईवडील असलेले आझाद सिंग व पूनम सिंग हे दोघेही उत्तरप्रदेशातून १५-२० वर्षांपूर्वी नागपुरात येऊन स्थायिक झाले. मिहान परिसरात मोलमजुरी करून पोट भरणारे हे कुटुंब. त्यांना या दोन जुळ््या मुली झाल्या तेव्हा नेहा विशेष अपत्य असल्याचे लक्षात आले. तिचे संगोपन त्यांनी फार कष्टाने व जबाबदारी आतापर्यंत केले आहे. नेहाची बहीण आकांक्षा ही दहावीत आहे.नेहाला उभं राहणे किंवा स्वतंत्र रित्या बसता येणे शक्य होत नाही. त्यामुळे ती कायमच अंथरुणावर असते. त्यातून तिला काही आजारही होत राहतात. सुषमा कांबळे मिहान परिसरात धान्याचे कीट वाटप करण्यासाठी फिरत असताना त्यांचा नेहाच्या कुटुंबासोबत परिचय झाला. नेहाची गरज लक्षात आल्यावर त्यांनी टुगेदर वुई कॅनचे शोएब मेमन यांच्याशी संपर्क साधला. शोएब यांनी पुढाकार घेत नेहाला व्हील चेअर मिळवून देण्याचे ठरवले. नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शशांक मनोहर यांच्या आर्थिक सहकार्याने त्यांनी नेहाला व्हीलचेअर मिळवून दिली. वर्षा मनोहर या नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांकरिता तसेच मेडिकलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शोएब मेमन यांचा टुगेदर वुई कॅन हा ग्रूप लॉकडाऊन काळात श्रमिकांकरिता व मजूर वर्गाकरिता धान्यवाटपासह मदतीची बरीच कामे करत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक