युगच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा
By Admin | Updated: September 4, 2014 00:57 IST2014-09-04T00:57:34+5:302014-09-04T00:57:34+5:30
सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या वर्गातील युग चांडकचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना फासावर लटकविण्याची मागणी विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी

युगच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा
युवक-युवतींचा कँडल मार्च : विविध संघटनांतर्फे श्रद्धांजली
नागपूर : सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या वर्गातील युग चांडकचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना फासावर लटकविण्याची मागणी विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी बुधवारी सायंकाळी संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केली.
याप्रसंगी तिरपुडे महाविद्यालयासोबतच शहरातील अनेकविध कॉलेजच्या युवक-युवतींनी संविधान चौकातून सदर येथील चर्चपर्यंत ‘कँडल मार्च’ काढून घटनेचा निषेध केला आणि युगला श्रद्धांजली वाहिली. याशिवाय विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा, सचिव तेजिंदरसिंग रेणू, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांच्यासह पुनीत महाजन, रवी अग्रवाल, जीवन धीमे, मनीष संघवी, विजय अग्रवाल यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून आरोपींना तात्काळ फासावर लटकविण्याची मागणी केली. यावेळी युवक-युवतींनीही घटनेवर संताप व्यक्त करून सरकारच्या कुचकामी धोरणाचा निषेध केला. अशा घटना नागपुरात वारंवार घडत आहे. यासाठी पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. वाहतूक विभागाने पुढाकार घेऊन चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)