‘हॅन्डलूम एक्स्पो’ला भरघोस प्रतिसाद हॅन्डमेड वस्तू ठरताहेत फॅशनचा पर्याय
By Admin | Updated: September 19, 2015 03:58 IST2015-09-19T03:58:41+5:302015-09-19T03:58:41+5:30
जुन ते सोनं म्हणतात ते यालाच. हाताने बनविलेल्या वस्तूंना आतापर्यंत जुने म्हणून नाकारले जात होते,

‘हॅन्डलूम एक्स्पो’ला भरघोस प्रतिसाद हॅन्डमेड वस्तू ठरताहेत फॅशनचा पर्याय
नागपूर : जुन ते सोनं म्हणतात ते यालाच. हाताने बनविलेल्या वस्तूंना आतापर्यंत जुने म्हणून नाकारले जात होते, मात्र त्याच वस्तू आज फॅशनचा पर्याय ठरत आहे. मग ते कपडे असो की घरातील इन्टेरीयरच्या वस्तू. म्हणूनच की काय नार्थ अंबाझरी रोडवरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरींगच्या हॉलमध्ये लागलेल्या हॅन्डलूम एक्स्पोला पहिल्याच दिवशीपासून नागपूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
अक्शा हॅन्डलूम हॅन्डीक्रॉफ्ट पर्यावरण विकास समितीतर्फे हे प्रदर्शन आणि विक्री केंद्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ११ राज्यातील ४० विणकर आणि १० हस्तशिल्पींचे ५० स्टॉल येथे लावण्यात आले आहेत. प्रदर्शनामध्ये विणकरांनी आपल्या कौशल्याने स्वत: बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशची चंदेरी व माहेश्वरी साडी, भागलपुरी सुट, टॉप, साड्या, आंध्र प्रदेशची कालमकरी, मंगलगिरी साडी, उत्तर प्रदेशचे लखनवी चिकन, राजस्थानी बेडशीट, काश्मीरची पश्मिना शॉल, पश्चिम बंगालची काथावर्कची साडी, सूट, टॉप, छत्तीसगडची कोसा सिल्क साडी व महाराष्ट्राची नऊवारी व सहावारी साड्या महिलांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
पुरुषांसाठीही कॉटनच्या आकर्षक कुर्ती, नवीन फॅशनचे शर्ट व लहान मुलांचे कपडेही लोकांच्या पसंतीस पडतील असे आहेत. कपड्यांसोबतच कलाकुसरीच्या वस्तूही लोकांचे विशेष लक्ष वेधत आहेत.
आसामच्या कारागिरांनी तयार केलेले हुबेहूब खऱ्या फुलांसारखे वाटणारे ड्रायफलावर, कॉईन मेड ज्वेलरी, सारंगपूरची लाकडी खेळणी, इमिटेशन ज्वेलरी व नक्षीकाम केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. गरीब विणकरांनी स्वत: बनविलेली वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठीहे प्रदर्शन लावल्याचे संस्थेचे संचालक प्रवीण चापरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
प्रदर्शन ५ आॅक्टोंबरपर्यंत चालणार आहे. या पत्रकार परिषदेला छत्तीसगडचे नथ्थूराम देवांगण, जयपूरचे रामेश्वर यादव आदी उपस्थित होते. (वा. प्र.)