महिलांची व्यथा अन् सामर्थ्याचे हृदयस्पर्शी चित्रण
By Admin | Updated: May 6, 2017 02:38 IST2017-05-06T02:38:47+5:302017-05-06T02:38:47+5:30
एकीकडे जीवनातील सुख दु:खाचे डोंगर सर करूनही मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणारी साहसी महिला तर दुसरीकडे समाजातील धनाढ्य

महिलांची व्यथा अन् सामर्थ्याचे हृदयस्पर्शी चित्रण
महानिर्मिती नाट्यस्पर्धा : ‘पोहा चालला महादेवा’, ‘शेवंता जित्ती हाय’चे दमदार सादरीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे जीवनातील सुख दु:खाचे डोंगर सर करूनही मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणारी साहसी महिला तर दुसरीकडे समाजातील धनाढ्य, वासनांध प्रवृत्तींकडून असहाय शोषित व पीडत महिलेवर झालेल्या अनन्वित अत्याचार. महिलांची व्यथा अन् सामर्थ्याचे हृदयस्पर्शी चित्रण करणारी दोन नाटके गुरुवारी महानिर्मिती नाट्यस्पर्धेत सादर झाली. यातील ‘पोहा चालला महादेवा’चे लेखक- ज. रा. फणसाळकर, दिग्दर्शक-भास्कर शेगोकार, सहदिग्दर्शक व संगीत-महेंद्र राऊत, निर्माता- मुख्य अभियंता, राजकुमार तासकर, सूत्रधार-राजेंद्र राऊत, चंद्रशेखर सवाईतुल, मनोहर खांडेकर, प्रदीप फुलझेले, संघ व्यवस्थापक-पुरुषोत्तम वारजूरकर, नेपथ्य-विजय मोहोड, नेपथ्य सहाय्य-विनोद तरासे, नरेंद्र चंदनकर, बाळू ओगटे, पांडुरंग नखाते, बाळकृष्ण मसमारे, संगीत सहाय्य-परिक्षित दापूरकर, हर्षद येवले, प्रकाश योजना-पीयूष टेकाळे, रंगभूषा-अवंतिका शेगोकार, उज्ज्वला राऊत, वेशभूषा-महेंद्र राऊत, सुभाष गानोजे यांचे होती तर माधुरी गानोजे, शंतनू जोशी, ज्ञानदीप कोकाटे, ऊर्मिला राऊत, सतीश ढोले, अभिषेक करंडे, भास्कर शेगोकार, मीना जोशी, रवी राऊत, विनायक पाटील, रेश्मा येरमे, यशवंत हटेवार, महेंद्र राऊत, नीतेश क्षीरसागर यांनी या नाटकात भूमिका साकारली.
संध्याकाळच्या सत्रात सादर झालेल्या ‘शेवंता जित्ती हाय’ या नाटकाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. चारपात्री, रहस्यमय नाटकातून प्रश्न उभे करत विजय सत्याचा की असत्याचा, शोषितांचा की शोषणकर्त्यांचा असे प्रश्न या नाटकाने उभे केले. या नाटकाचे लेखक-प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक-मंगेश डोंगरे, निर्माता-मुख्य अभियंता वसंत खोकले, सह दिग्दर्शक-एम.पी.सोहनी, संघ व्यवस्थापक-संजय गोळपकर, नेपथ्य-उदय भोसले, नेपथ्य सहायक-दिलीप जाधव,संजय गोळपकर,प्रकाश-उदय पोटे, प्रकाश योजना सहायक-संतोष डोंगरे,रंगभूषा-वेशभूषा- मंगेश डोंगरे,रंगभूषा वेशभूषा सहायक-संतोष सावंत,संगीत-राजेंद्र इकारे,संगीत सहायक-आशुतोष जगदाळे,अभिजित साळुंखे, रंगमंच व्यवस्था-रामा भागत, प्रफुल्ल फुलझेले यांची होती. विक्रांत जिरंगे,विश्वास कांबळे,प्रमोद बोडरे आणि मंगेश डोंगरे यांनी या नाटकात भूमिका स्वीकारली.
आज समारोप : महानिर्मिती नाट्यस्पर्धेचा समारोप शनिवारी रात्री ८ वाजता होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमात महानिर्मितीचे चंद्रकांत थोटवे - संचालक (संचलन), श्याम वर्धने-संचालक(खनिकर्म), विनोद बोंदरे-कार्यकारी संचालक(मासं), अनिल नंदनवार-कार्यकारी संचालक(प्रकल्प) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण केले जाणार आहे.