शुभांगीच्या मदतीसाठी सरसावले हात

By Admin | Updated: August 11, 2016 02:08 IST2016-08-11T02:08:23+5:302016-08-11T02:08:23+5:30

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या शुभांगी शेषराव देशभ्रतार या युवतीच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात पुढे आले आहे.

Hands handy to help the auspicious | शुभांगीच्या मदतीसाठी सरसावले हात

शुभांगीच्या मदतीसाठी सरसावले हात

नागपूर : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या शुभांगी शेषराव देशभ्रतार या युवतीच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात पुढे आले आहे. तिच्या उपचारासाठी १९ इंजेक्शन लागणार होते. प्रती इंजेक्शनचा खर्च १८००० रुपये होता. या संपूर्ण इंजेक्शनची सोय झाली आहे. मेडिकल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे, हळूहळू तिच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. शुभांगीसाठी लोकमतने समाजाला मदतीचे आवाहन केले होते.
शुभांगीला ‘थायमोमा’ व ‘मॅस्थेनिया ग्रॅव्हीस’नावाचा दुर्धर आजार जडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ‘मॅस्थेनिया ग्रॅव्हीस’ हा विदेशी आजार असून, त्यावर अमेरिकेत उपचार होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तिच्या उपचारासाठी अमेरिके तून औषधे मागवावी लागणार होती. १९ इंजेक्शन डॉक्टरांनी सांगितले होते. एक इंजेक्शन १८ हजार रुपयांचे होते. डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचार घेणे तिला अवघड जात होते. तिच्या उपचारासाठी आर्थिक बळ जमविण्यासाठी घरच्यांचा आटापिटा सुरू होता. परंतु आर्थिक मदतीचा कुठूनही हात पुढे येत नसल्याने तेही हतबल झाले होते. लोकमतने तिच्या मदतीसाठी समाजाला आवाहन केले होते. लोकमतच्या आवाहनाला साद देत सॉफ्टवेअर इंजिनीअर अभिजित फाळके यांनी तिच्या नातेवाईकाशी संपर्क साधून राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून ११ इंजेक्शन उपलब्ध करून दिली.
विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा राजीव गांधी योजनेतून तिची केस रद्द झाली होती. अभिजित फाळके यांच्या प्रयत्नामुळे योजनेचा तिला लाभ मिळाला. त्याचबरोबर एका अग्रवाल नावाच्या इसमाने तिच्या ८ इंजेक्शनची सोय करून दिली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. ती बरी झाल्यानंतर ‘थायमोमा’ चे आॅपरेशन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hands handy to help the auspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.