शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार व राष्ट्रवादीच्या हिंगणा विधानसभा अध्यक्षाची हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:51 IST

हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे यांच्यात झालेल्या हमरीतूमरीची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे. हा प्रकार चक्क सीईओंपुढे त्यांच्या कक्षात झाला. आमदार अंगावर धावून आल्याचा आरोप प्रकाश नागपुरे यांनी केला आहे.

ठळक मुद्देसीईओंच्या कक्षातील घटना : आरोग्य उपकेंद्रावरून झाला वाद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे यांच्यात झालेल्या हमरीतूमरीची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे. हा प्रकार चक्क सीईओंपुढे त्यांच्या कक्षात झाला. आमदार अंगावर धावून आल्याचा आरोप प्रकाश नागपुरे यांनी केला आहे.हिंगणा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, जि.प.चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, नागपूर पं.स.चे उपसभापती संजय चिकटे व राष्ट्रवादीचे सचिव विष्णू माथनकर हे पाणी पुरवठ्याच्या कामासंबंधी सीईओंकडे गेले होते. सीईओंसोबत चर्चा सुरू असताना आमदार मेघेही तेथे आले. त्यांनी आरोग्य उपकेंद्राचे काम थांबविण्यात आल्यावरून बोलायला सुरुवात केली. ते आवेशात बोलत असल्यामुळे नागपुरे यांच्यासोबत असलेल्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण आमदार उठून त्यांच्या अंगावर आल्याचा आरोप नागपुरे यांनी केला. नागपुरे यांनी समजविण्याचा प्रयत्न केला, पण आमदार चांगलेच संतापले होते. यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी केल्यामुळे सीईओंच्या कक्षातील वाद निवळला. हा वाद आरोग्य उपकेंद्रावरून झाला. २०१८-१९ मध्ये बोरखेडी फाटक येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले होते. त्याचे भूमिपूजन आमदार मेघे यांनी स्वत: केले होते. मात्र नंतर आमदारांनी या केंद्राचे बांधकाम त्यांच्या सूतगिरणीच्या परिसरात करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात तक्रारी झाल्याने जि.प. प्रशासनाने चौकशी करून बांधकाम थांबविले, असल्याचे नागपुरे म्हणाले. आज दोघेही सीईओंच्या कक्षात समोरासमोर आल्याने आमदाराचा भडका उडाला.आमदाराला क्रेडिट मिळू नये म्हणून विरोधज्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र बनत होते ती जागा न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी दुसरी कुठलीही जागा मिळत नसल्यामुळे माजी जि.प. सदस्य माझ्याकडे आले होते. आरोग्य उपकेंद्राचा पैसा परत जाऊ नये म्हणून मी माझी जागा आरोग्य केंद्रासाठी दिली. तिथे उपकेंद्राचे कामही सुरु झाले होते. पण प्रकाश नागपुरे यांनी लोकप्रतिनिधी नसतानाही आक्षेप घेतला व आरोग्य केंद्राचे काम बंद पाडले. गुरुवारी ते सीईओंच्या कक्षात होते म्हणून हा विषय काढला. तेव्हा त्यांनीही अरेतुरेची भाषा वापरली. त्यामुळे हमरीतूमरी झाली.समीर मेघे, आमदार, हिंगणा विधानसभा

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरMLAआमदार