शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ४३ प्लॉटवरील अतिक्रमणावर हातोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:25 IST

रिंगरोडमुळे बाधित झालेल्यांचे पुनवर्सन करून त्यांना पर्यायी देण्यात आली होती. त्यानंतरही नासुप्रच्या बाबुळखेडा येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण के ले होते. नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले.

ठळक मुद्देनासुप्रची कारवाई : जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिले होते निर्देेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिंगरोडमुळे बाधित झालेल्यांचे पुनवर्सन करून त्यांना पर्यायी देण्यात आली होती. त्यानंतरही नासुप्रच्या बाबुळखेडा येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण के ले होते. नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारीनुसार नासुप्रच्या दक्षिण विभागाच्या कार्यक्षेत्रातील मौजा-बाबुळखेडा येथील खसरा क्रमांक ६८/१ क, ६८/१ ख येथील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नासुप्रचे अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले.अधिनिष्कासितांचे अनधिकृत बांधकाम काढण्याची कार्यवाही नागपूर सुधार प्रन्यासचे दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता (दक्षिण) संजय एन. चिमूरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) अविनाश बडगे, सहायक अभियंता संदीप एम. राऊत, पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यात अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. एल. उरलागोंडावार व ५० पोलीस अधिकारी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील सहभागी होते.रिंगरोडच्या बांधकामादरम्यान ज्या भूखंडधारकांचे प्लॉट रिंगरोडने बाधित झाले होते अशा सर्व बाधितांचे पुर्नवसन करण्याकरिता यूएलसीद्वारे सन १९९१ ला नागपूर सुधार प्रन्यासच्या बाबुळखेडा, शताब्दीनगर येथे जमीन देण्यात आली होती. त्यावर प्रन्यासद्वारे अभिन्यास तयार करून १०४ बाधितांना भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु सदर जागेवर खासगी अनधिकृत अभिन्यास सन १९७३ पासून वसलेले असल्यामुळे तेथील भूखंडधारकांनी न्यायालयात धाव घेतली. त्याअनुषंगाने शासनाचे ८ सप्टेंबर २०१७ च्या आदेशान्वये नासुप्र मौजा-बेसा, खसरा क्रमांक ६६/१ व ६६ येथील १३,३३१.८५ चौ.मी. जागा बाधितांना पुनर्वसनासाठी देण्यात आली व खांडेकर ले-आऊट येथील भूखंडधारकांचे भूखंड गुंठेवारीअंतर्गत नासुप्रद्वारे नियमित करण्यात आले. त्याअनुषंगाने मौजा-बेसा येथे नवीन अभिन्यास निर्माण करून बाधितांना भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु बाधितांनी बेसा येथील भूखंडाचा ताबा घेतला; परंतु बाबुळखेडा येथील भूखंडाचा ताबा सोडला नव्हता.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास