अर्धा किलाे गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:55+5:302020-12-06T04:08:55+5:30

खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील किल्ले काेलार परिसरात कारवाई करीत ...

Half a kilo of cannabis seized | अर्धा किलाे गांजा जप्त

अर्धा किलाे गांजा जप्त

खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील किल्ले काेलार परिसरात कारवाई करीत गांजा विक्रेत्यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ५,१०० रुपये किमतीचा ५४०.०३ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ३) रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

माेहम्मद फिराेज फारूक शेख (३१, रा. काेराडी नाका, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापरखेडा परिसरात गस्तीवर असताना त्यांना दहेगाव (रंगारी), ता. सावनेर शिवारातील किल्ले काेलार परिसरात गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली. यात त्यांना या परिसरातील एका हाॅटेलसमाेर माेहम्मद फिराेज फारूक शेख संशयास्पद स्थितीत आढळून आला. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्यामुळे त्याला लगेच अटक केली आणि त्याच्याकडून ५,१०० रुपये किमतीचा ५४०.०३ ग्रॅम गांजा जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, विनाेद काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Half a kilo of cannabis seized