शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अर्ध्या शहर बसेसची चाके थांबली : नागपुरात वेतनासाठी चालक-वाहकांचा अचानक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:16 PM

महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देप्रवासी व विद्यार्थी त्रस्त

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. अनेक विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाऊ शकले नाही. संप पुकारणाऱ्या  कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारीही संप सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.शहर बस वाहतुकीची तीन कंपन्यांवर जबाबदारी आहे. यातील आर.के.सिटी बसचे चालक-वाहक वेळेवर वेतन मिळत नसल्याने नाराज आहेत. १० डिसेंबरपर्यंत वेतन देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. परंतु वेतन मिळाले नाही. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी संप पुकारला होता. परंतु दुपारनंतर कामावर परतले. मात्र वेतन न मिळाल्यास संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. संपामुळे खापरखेडा, कामठी, कन्हान, खरबी, पन्नासे ले-आऊ ट आदी भागातून सुटणाऱ्या  बसेस उभ्या होत्या.कंपनीने दुपारनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा केले. परंतु कामावरून कमी केलेले चालक भाऊ राव रेवतकर यांना कामावर घेण्यास नकार दिला. यामुळे कामगार सेनेचे संघटक प्रशांत मोहिते यांनी गुरुवारी संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.संपावर न जाण्याचा पोलिसांचा सल्लाविधिमंडळाचे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन विचारात घेता, बस कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असा सल्ला धंतोली पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. संपाची माहिती देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी धंतोली पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस निरीक्षक सीमा मेहंदळे यांनी हा सल्ला दिला, सोबतच अचानक संप पुकारल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :StrikeसंपTravelप्रवास