शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:39 IST

अल्फा वेव्ह ग्लोबलला विकणार ६% हिस्सा : कंपनीच्या ८६,००० कोटींच्या मूल्यांकनावर १३,१०० कोटींचा करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय बहुराष्ट्रीय स्नॅक्स आणि मिठाई कंपनी हल्दीराम स्नॅक्स फूइसने सिंगापूरस्थित जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेकसोबत भारतीय कंपनीतील ९ टक्क्यांहून अधिक हिस्सा विकण्यासाठी करार केल्याची माहिती आहे. कंपनीने कराराचा आकार जाहीर केला नसला तरी, बाजारातील अंदाजानुसार तो ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. कंपनीचे मूल्य १० अब्ज डॉलर्स (८६,००० कोटी) इतके आहे, हे विशेष.

करारांतर्गत टेमासेक हल्दीरामच्या विद्यमान भागधारकांकडून इक्विटी हिस्सा खरेदी करेल. या करारासाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या पीडब्ल्यूसी इंडियाने सांगितले, या व्यवहारामुळे हल्दीरामचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार होईल. कंपनी त्याच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजना सुरू ठेवू शकेल. वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत कंपनीची उपस्थिती मजबूत होईल.

अल्फा वेव्ह ही एक जागतिक गुंतवणूक कंपनीहल्दीरामने सोमवारी आयएचसी (इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी) आणि अल्फा वेव्ह ग्लोबल या दोन नवीन गुंतवणूकदारांना हिस्सा विकण्याची पुष्टी केली. परंतु, निवेदनात कराराची तपशीलवार माहिती देण्यात आली नाही. हल्दीरामने अमेरिकन गुंतवणूक कंपनी अल्फा वेव्ह ग्लोबलला सोमवारी ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत ६ टक्के हिस्सा विकल्याची माहिती आहे. अल्फा वेव्ह ही एक जागतिक गुंतवणूक कंपनी असून खासगी इक्विटी, खासगी कर्ज आणि सार्वजनिक बाजारपेठेत कार्यरत आहे. तर आयएचसी ही संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपन्यांपैकी एक आहे.

२०२३-२४ मध्ये १२,५०० कोटींचे उत्पन्न

  • आर्थिक वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात हल्दीरामने १२,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला. या करारानंतरही कंपनीकडे बहुसंख्य हिस्सा राहील. हल्दीराम भविष्यात आणखी हिस्सेदारी विकण्यासाठी इतर गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.
  • करारासंदर्भात समूहाचे संचालक राजेंद्र अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे हल्दीराममध्ये गुंतवणूकदार आणि भागीदार म्हणून टेमासेकचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत असल्याची माहिती समूहाच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तसेवेला दिली.
टॅग्स :nagpurनागपूरMarketबाजारshare marketशेअर बाजार