रोकडे ज्वेलर्समध्ये ‘हळदी-कुंकू’ महोत्सव ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:24+5:302021-02-05T04:50:24+5:30

नागपूर : रोकडे ज्वेलर्सतर्फे १५ ते २० जानेवारीदरम्यान आयोजित ‘हळदी-कुंकू’ महोत्सवाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळे रोकडे ज्वेलर्सची लोकप्रियता ...

'Haldi-Kunku' Festival at Rokade Jewelers () | रोकडे ज्वेलर्समध्ये ‘हळदी-कुंकू’ महोत्सव ()

रोकडे ज्वेलर्समध्ये ‘हळदी-कुंकू’ महोत्सव ()

नागपूर : रोकडे ज्वेलर्सतर्फे १५ ते २० जानेवारीदरम्यान आयोजित ‘हळदी-कुंकू’ महोत्सवाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळे रोकडे ज्वेलर्सची लोकप्रियता व विश्वास परत एकदा अधोरेखित झाला. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेत महिलांनी विविध भेटवस्तू जिंकल्या. महोत्सवाची सुरुवात १५ जानेवारीला डान्स स्पर्धेने झाली. यामध्ये फुगडी, घागर, सूप आदी महिलांचे सामूहिक लोकनृत्य झाले. १६ रोजी नऊवारी ड्रेस स्पर्धा, १७ रोजी इंडो-वेस्टर्न थीम, १८ रोजी तिळाचे विविध क्रिएटिव्ह, १९ रोजी हलवा दागिने क्रिएटिव्ह आणि २० जानेवारीला उखाणा स्पर्धेचे आयोजन झाले. महोत्सवादरम्यान रोकडे ज्वेलर्सच्या शोरूममधील वातावरण अतिशय प्रसन्न आणि खेळीमेळीचे होते.

स्पर्धेत नावनोंदणी करून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्व स्पर्धक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रोकडे ज्वेलर्सच्या वैशिट्यपूर्ण आकर्षक आभूषणांचे कौतुक केले. बऱ्याच ग्राहकांनी दागिने खरेदी केले. रोकडे ज्वेलर्सतर्फे नियमितपणे ग्राहकांच्या भेटीसाठी विविध कार्यक्रम, महोत्सव, स्पर्धा आणि दागिने महोत्सवाचे आयोजन करते. भविष्यातही विविध उत्साहपूर्ण कार्यक्रम आम्ही ग्राहकांच्या भेटीला आणू, असा विश्वास रोकडे ज्वेलर्सने नागपूरकरांना याप्रसंगी दिला. (वा.प्र.)

Web Title: 'Haldi-Kunku' Festival at Rokade Jewelers ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.