सुनील शिनखेडे यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:08 IST2021-07-31T04:08:58+5:302021-07-31T04:08:58+5:30

नागपूर : मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, ...

Halasgikar state level award to Sunil Shinkhede | सुनील शिनखेडे यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

सुनील शिनखेडे यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

नागपूर : मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शनिवारी ३१ जुलै रोजी जुळे सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा. एन.डी. जोशी सभागृहात हा पुरस्कार शिनखेडे यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुळकर्णी व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुनील शिनखेडे यांच्या नावावर गंधाक्षरे, गंध कोवळे ऋतू , नवीन काही (कवितासंग्रह), उदकाचा गर्भ, मेघांची पालखी, शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर (ललित लेख संग्रह), हिरव्या बोलीचा बहर (ना. धों. महानोर यांच्या कवितेची समिक्षा), बातमीची विविध क्षेत्रे (पुस्तक) अशी साहित्य संपदा आहे.

............

Web Title: Halasgikar state level award to Sunil Shinkhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.