कुख्यात शेख मुबारकचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:09 IST2021-05-21T04:09:32+5:302021-05-21T04:09:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड शेख मुबारक शेख याने बुधवारी मध्यरात्री सिंधीबन परिसरात हैदोस घातला. ...

Haidos of the infamous Sheikh Mubarak | कुख्यात शेख मुबारकचा हैदोस

कुख्यात शेख मुबारकचा हैदोस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड शेख मुबारक शेख याने बुधवारी मध्यरात्री सिंधीबन परिसरात हैदोस घातला. शस्त्राच्या धाकावर एकाला शिवीगाळ करून मारहाण केली. शेख मुबारक हा सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हत्येच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षाही झाली आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. तो नेहमीच परिसरातील नागरिकांना शस्त्राच्या धाकावर धमकावून खंडणी वसुली करतो आणि विनाकारण जीवे मारण्याची धमकी देऊन लूटमार करतो. काही दिवसांपूर्वी परिसरातील शेख मुस्तकीन शेख ताजू यांच्या भावासोबत मुबारकचा वाद झाला होता. त्याची इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, मुस्तकीन त्यांच्या मित्रांसोबत गप्पा करत असताना शेख मुबारकने बुधवारी मध्यरात्री त्यांच्या जवळ आला. त्या गुन्ह्याबद्दल सेटलमेंट करण्यासाठी धमकी दिली. मुस्तकीन यांनी नकार दिला असता आरोपीने त्यांना मारहाण केली. यावेळी त्याच्यासोबत त्याचा लाल लाइटनामक साथीदार होता. त्याला हत्यार निकाल, हत्यार निकाल, असे म्हणून मुबारक चिथावणी देत होता. आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी तिथून पळून गेले. या घटनेची तक्रार मुस्तकीन यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी मुबारकविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Haidos of the infamous Sheikh Mubarak