शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ नागरिकांसाठी खुला; नागपूरच्या वाहतुकीला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:45 IST

१२ ला दुसऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन : सर्व्हिस रोडवरही सुरू होणार वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अमरावती रोडवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचा दुसरा टप्पा अखेर नागरिकांसाठी खुला होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी आरटीओ चौक ते फुटाळा चौक या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे वाडी पोलिस ठाण्यापासून गुरुद्वारापर्यंतचे ५ किमीचे अंतर केवळ ५ मिनिटांत पार करता येईल. महाराजबाग क्लबपासून सर्व्हिस रोडवरही वाहतूक सुरू होणार आहे.

या उड्डाणपुलाला 'ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल' असे नाव देण्यात आले आहे. बोले पेट्रोल पंपाजवळून सुरू होणारा हा पूल फुटाळा चौकापर्यंत २.८४३ किमी लांबीचा असून, वाडी पोलिस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उड्डाणपूल १.९५ किमी लांबीचा आहे. पुलावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ८० किमी प्रतितास निश्चित केली असली तरी ६० किमी वेगानेही हे संपूर्ण अंतर सहज पार होऊ शकते.

सर्व्हिस रोडवरही सुरू होणार वाहतूक

आरटीओ कार्यालयासमोरील नाल्यावर स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, बोले पेट्रोल पंप ते लॉ कॉलेजकडे जाणारी वाहतूक लवकरच सुरू होणार आहे. फुटाळा चौकाच्या दिशेने एक बाजूच्या सव्हिस रोडचे काम अद्याप शिल्लक आहे, तेही लवकरच पूर्ण होणार आहे. 

बांधकामात अपघात शून्य

या प्रकल्पाच्या कामाला झाडे तोडण्यास परवानगी मिळण्यात विलंब झाल्याने सुमारे वर्षभर उशीर झाला. मात्र, विशेष म्हणजे बांधकामादरम्यान कोणताही मोठा अपघात घडला नाही. पुलावर एकूण ७६६ सेग्मेंट्स बसविण्यात आले.भरतनगर भागात एका झाडाला वाचवण्यासाठी दोन फाउंडेशनचे डिझाइन बदलण्यात आले.तसेच लॉ कॉलेज चौकात मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून ६५ मीटर लांबीचे, २५० टन वजनाचे ६ गर्डर उभारण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरroad transportरस्ते वाहतूक