पाराशर ब्राह्मण युवा मंचतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:32+5:302021-07-28T04:07:32+5:30

नागपूर : पाराशर ब्राह्मण युवा मंच व महर्षी व्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौणिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले ...

Gurupournima celebration by Parashar Brahmin Youth Forum | पाराशर ब्राह्मण युवा मंचतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव

पाराशर ब्राह्मण युवा मंचतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव

नागपूर : पाराशर ब्राह्मण युवा मंच व महर्षी व्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौणिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत मिटकर, प्रभाकर ठेंगडी, संजय रहिसे, शोभना मोहरील उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहिणी मोहरील यांनी केले. आरती चाटे यांनी गुरुवंदना सादर केली. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शोभना मोहरील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. आभार दीपा काठीकर यांनी मानले.

- मरियमनगरातील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या ()

नागपूर : मरियमनगर येथे मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्याची मागणी मरियमनगर विकास समितीतर्फे एनआयटीचे ट्रस्टी संजय बंगाले यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक मार्टिन मोरीश, समितीचे सचिव युजिन जोसेफ, युबट जॉर्ज अंथोनी, प्रकाश मायकल आदी उपस्थित होते.

Web Title: Gurupournima celebration by Parashar Brahmin Youth Forum