रिक्त पदामुळे गुंठेवारी नासुप्रकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:03+5:302021-02-08T04:08:03+5:30
पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष : ५ हजाराहून अधिक पदे रिक्त : सुधारित आकृतिबंध लागू करण्यात अपयश लोकमत न्यूज नेटवर्क ...

रिक्त पदामुळे गुंठेवारी नासुप्रकडे?
पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष : ५ हजाराहून अधिक पदे रिक्त : सुधारित आकृतिबंध लागू करण्यात अपयश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. मागील काही वर्षात नवीन पदभरती झालेली नाही. सुधारित आकृतिबंध लागू झालेला नाही. सद्यस्थितीत मनपात ३५ टक्के पदे म्हणजेच ५२५३ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत नगररचना विभागाकडे आलेल्या गुंठेवारी विभागाकडे आलेली गुंठेवारीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग नव्हता. परिणामी प्रकरणे प्रलंबित असल्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने गुंठेवारी विभाग नासुप्रकडे गेल्याची चर्चा मनपात आहे.
गुंठेवारीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची कंत्राटी भरती केली असती, तर या कामाला गती मिळाली असती. मनपाच्या महसुलात १०० ते १२५ कोटींनी वाढ झाली असती. बिकट आर्थिक स्थितीत दिलासा मिळाला असता. गुंठेवारी विभाग मनपाकडे कायम राहिला असता, अशी माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी दिली.
मनपामध्ये वर्ग १ ते ४ व सफाई मजूर अशी एकूण १५ हजार ९४३ पदे मंजूर आहेत. यापैकी १० हजार ९०८ पदे भरलेली असून ५ हजार २५३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३५ टक्केच्या आसपास आहे. याचा परिणाम कर वसुलीवरही होत आहे.
वर्ग १ मधील २१४ पदांपैकी १०३ पदे भरलेली असून १११ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची ७७ पदे मंजूर असून २३ पदे भरलेली असून ५४ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ ची ३ हजार ७९१ पदे मंजूर असून १ हजार ७३५ पदे भरलेली आहेत, तर २ हजार ५६ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची २ हजार ७५४ पदे मंजूर असून ८८२ पदे भरलेली आहेत, तर १ हजार ८७२ पदे खाली आहेत. सफाई मजुरांची ३ हजार ९४५ पदे मंजूर असून ३ हजार ८६३ पदे भरलेली आहेत, तर ८२ पदे रिक्त आहेत.
...
दोन हजाराहून अधिक सेवानिवृत्त
२०१४ ते डिसेंबर २०२० या सहा वर्षांच्या कालावधीत मनपातील दोन हजाराहून अधिक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना काही अटी व शर्तींच्या आधीन संधी देण्यात आली. परंतु ही संख्या २०० हून अधिक नाही.
........
रिक्त पदांची आकडेवारी
संवर्गमंजूर पदे रिक्त पदे
वर्ग -१ २१४ १११
वर्ग -२ ७७ ५४
वर्ग -३ ३७९१ २०५६
शिक्षक ७५५ ००
वर्ग - ४ २७५४ १८७२
सफाई मजदूर ३९४५ ८२
सफाई मजदूर
अधिसंख्यपद ४४०७ १०७८