“संवाद संधींचा” माध्यमातून तरुणाईला मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:09+5:302021-06-18T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्री दिगंबर जैन बघेरवाळ मंडळातर्फे “संवाद संधींचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ३० ...

“संवाद संधींचा” माध्यमातून तरुणाईला मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री दिगंबर जैन बघेरवाळ मंडळातर्फे “संवाद संधींचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ३० मे, ६ जून व १२ जून रोजी झालेल्या या उपक्रमात ऑनलाईन माध्यमातून नोकरी, व्यापार, व्यावसायिक क्षेत्रांमधील संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमामुळे बघेरवाळ समाजातील युवक व युवतींना तसेच त्यांच्या पालकांना आयुष्यातील पुढील करिअरची निवड करण्यासाठी छान उद्बोधन या व्यासपीठावरून मिळाले. देश-विदेशातील तज्ज्ञांनी या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना करिअर व व्यावसायिक क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागपूर शाखा अध्यक्ष सुधीर मिश्रीकोटकर, सचिव वैजेश पेंढारी, कोषाध्यक्ष निनाद नांदगांवकर, प्रकल्प प्रमुख प्रशांत पेंढारी, मिलिंद गहाणकरी, चंद्रनील जोगी, निलय जिंतूरकर, देवेंद्र आग्रेकर, निकिता देवलसी, पूनम खेडकर, रुपाली पेंढारी, विभास गहाणकर, क्षमा देवलसी, गझल गहाणकर, स्वाती पेंढारी, सोनाली नांदगावकर, नम्रता जैन, प्रियांक जोहरापूरकर, माधवी जैन, चैतन्य आग्रेकर, प्रियेश डोणगांवकर, अनुप खंडारे, व्दिपेंद्र जोहरापूरकर, अनिल जिंतूरकर, महेश पेंढारी, नीती गरिबे, परिमल खेडकर, शैलेश खेडकर, विलास जोहरापूरकर, स्नुषा खेडकर, कुणाल खेडकर, वर्षा जिंतूरकर यांनी परिश्रम घेतले.