कल्पतरू महिलांतर्फे महिला दिनाला मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:04+5:302021-03-17T04:08:04+5:30
यावेळी मीनाक्षी किंमतकर यांनी घरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कम्पोस्ट खतात रूपांतरण करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. डॉ. कीर्तिदा अजमेरा ...

कल्पतरू महिलांतर्फे महिला दिनाला मार्गदर्शन
यावेळी मीनाक्षी किंमतकर यांनी घरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कम्पोस्ट खतात रूपांतरण करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. डॉ. कीर्तिदा अजमेरा यांनी महिलांनी छोटे उद्योग कमी भांडवलात कसे उभारावे, एमएसएमईच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, आदींविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष छाया शुक्ला यांनी महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी ऑरेंजसिटीच्या वतीने कोरोना काळात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. यात प्रतिभा कडू, डॉ. वैशाली लोणकर, मोनाली मलेवार व वासंती केळकर यांचा समावेश होता. सत्कारमूर्तींचा परिचय आसावरी वडकर यांनी करून दिला. यावेळी कल्पतरूच्या अध्यक्ष नीलिमा बावणे यांनी आत्मनिर्भर भारतासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वेगवेगळ्या व्यवसायासोबतच शेतीकडेही वळण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी कल्पतरूच्या वतीने मेघा गडे, डॉ. स्मिता घोंगे, अश्विनी सुर्वे, वैशाली पानकर, वैशाली कोठे, मुलमुले यांचा सत्कार केला. यांचा परिचय तृप्ती मेश्राम यांनी करून दिला. संचालन प्रतिभा वैरागडे यांनी केले तर आभार कल्पना अडकर यांनी मानले. ढोरे यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय अनघा मुळे व भारती तामसकर यांनी करून दिला.
...............