शासकीय कार्यक्रमातून पालकमंत्र्यांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:03+5:302021-09-12T04:12:03+5:30

कुलगुरूंवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे कास्ट्राईबची मागणी नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूरमार्फत शनिवारी पशुवैद्यकीय चिकित्सा ...

The Guardian Minister was removed from the government program | शासकीय कार्यक्रमातून पालकमंत्र्यांना डावलले

शासकीय कार्यक्रमातून पालकमंत्र्यांना डावलले

कुलगुरूंवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे कास्ट्राईबची मागणी

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूरमार्फत शनिवारी पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यातून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरुंवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने, राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, आमदार विकास ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्य यांचा उल्लेख केला आहे. मात्र जिल्ह्याचे सर्वात महत्त्वाचे लोकप्रतिनिधी व प्रथम नागरिक असलेले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांना कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आले. जिल्ह्यात कुठलाही शासकीय कार्यक्रम असो राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत असणे अनिवार्य आहे, अन्यथा हक्कभंग होऊन संबंधित शासकीय संस्थेच्या प्रमुखावर हक्कभंगाची कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठचे (माफसू) कुलगुरू यांनी पालकमंत्र्यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव न छापून राजशिष्टाचाराचा भंग केला असल्यामुळे या विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे व जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.

Web Title: The Guardian Minister was removed from the government program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.