शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भूजल पातळी सव्वादोन फुटांनी घसरली : कामठी खैरी धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:34 IST

जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. धरणांनी तळ गाठला आहे. नागपुरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन फुटांनी खाली आली आहे. कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात पाऊस बरसला नाही, तर पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देतोतलाडोह, गोरेवाडा तलाव कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. धरणांनी तळ गाठला आहे. नागपुरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन फुटांनी खाली आली आहे. कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात पाऊस बरसला नाही, तर पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विभागातील धरणांची परिस्थिती भयावह झाली आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही २९६४.४३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला म्हणजे १३ जून रोजी केवळ १८३.७८ दलघमी म्हणजेच केवळ ६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यात नागपूर जिल्ह्यातील पाच मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या पाचपैकी तोतलाडोह व लोवर वणा हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तोतलाडोह प्रकल्पाचा साठा १०१६ दलघमी इतका आहे. तर लोवर वणाचा साठा ५३ दलघमी इतका आहे. या दोन्ही प्रकल्पात ० टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरित धरणांची स्थितीही वेगळी नाही. कामठी खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची क्षमता १४१.७४ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या घडीला ३३.६३ दलघमी म्हणजेच २४ टक्के इतकेच पाणी आहे. रामटेक धरणाची क्षमता १०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ७.९२ दलघमी म्हणजेच ८ टक्के इतका साठा आहे. वडगाव धरणाची क्षमता १३५ दलघमी इतकी असून त्यात केवळ १५.१२ दलघमी म्हणजेच ११ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांसोबतच मध्यम प्रकल्पांची स्थितीही वाईट आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकारचे प्रकल्प (धरणे) आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. त्यात १३ जून रोजीपर्यंत केवळ १८.१२ दलघमी म्हणजेच केवळ ९ टक्के इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.पाऊस न पडल्याने एकीकडे धरणे आटली आहेत, तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील भूजलाची पातळीसुद्धा घसरली आहे. यंदा ती ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन मीटरने खाली आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता लवकरच पाऊस न आल्यास ही परिस्थिती भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोरेवाडा तलावातील विहीर पडली उघडीनागपूर शहरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव हा कधीच आटलेला दिसला नाही. आज हा तलाव कोरडा पडला आहे. परिसरातील अनेक लोक गोरेवाडा जंगलात पहाटे फिरायला जातात. त्यांना ही विहीर दिसल्याने त्यांनाही आश्चर्य वाटले. पसिरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक तभाने हे सुद्धा येथे फिरायला येतात. त्यांनी सांगितले की, गोरेवाडा हा तलाव १०० वर्षे जुना आहे. इंग्रजांनी तो बांधला. तलाव कधीच आटलेला आम्ही पाहिला नाही. परंतु आज तलाव आटल्याने येथे एक सुस्थितीत असलेली विहीर आढळून आली. काही जुन्या मंडळींनी सांगितल्यानुसार पूर्वी तलावाच्या परिसरात वस्ती होती. त्यासाठीच ती विहीर बांधलेली होती. इंग्रजांनी तलाव बांधण्यासाठी वस्ती हटविली. आज तलाव कोरडा पडल्याने येथे वस्ती असल्याची साक्ष ही विहीर देत आहे.१११ विहिरींच्या निरीक्षणातून भूजल पातळीची नोंदनागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यातील १११ विहिरींच्या निरीक्षणातून आणि मागील पाच वर्षांच्या तुलनात्मक सरासरीतून नोंदवली जाते. जिल्ह्यातील १११ निरीक्षण विहिरी आहेत. त्यांचे वर्षातून चारवेळा निरीक्षण करून तसा अहवाल तयार केला जातो. हे निरीक्षण सप्टेंबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात केले जाते. त्या आधारावर पाणीटंचाईचा अहवाल तयार केला जातो. मे महिन्यात करण्यात आलेले निरीक्षण आणि मागील पाच वर्षातील भूजल पातळीची तुलना करून सरासरी भूजल पातळीची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ८.४६ मीटर इतकी आहे. ती ०.६८ मीटर म्हणजेच दोन फुटांनी खाली घसरली आहे. तालुकानिहाय विचार केला असता भिवापूर ०.६७ मीटर, हिंगणा ०.६६ मीटर, कळमेश्वर ०.५४ मीटर, कामठी ०.७२ मीटर, काटोल ०.६४ मीटर, कुही ०.३८ मीटर, मौदा ०.९४ मीटर, नागपूर ०.०९ मीटर, नरखेड १.२९ मीटर, पारशिवनी ०.४९ मीटर, रामटेक १.१३ मीटर, सावनेर ०.७१ मीटर आणि उमरेड तालुक्यातील ०.५७ मीटरने भूजल पातळी खाली घसरली आहे.रामटेक-नरखेडला काटकसरीची गरजनागपूर जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाली असली तरी महाराष्ट्राच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याला फार चिंता करण्याची गरज नाही. १ ते २ मीटर पाणी पातळी कमी झाली तरी ती चिंताजनक समजली जात नाही. ती सांभाळून घेता येते. नागपुरातील एकाही तालुक्यात तशी परिस्थिती नाही. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी काही जाणकारानुसार येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास नरखेड व रामटेक तालुक्याला जून व जुलै महिन्यापर्यंत पाण्याची काटकसर करावी लागेल. तसेच मौद्यालाही किमान जून महिन्यापर्यंत तरी पाण्याच्या काटकसरीची आवश्यकता आहे.पाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीनागपूर विभागाचा विचार केल्यास पाणीसाठ्यााबत मागील पाच वर्षात यंदा सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. विभागातील एकूण १८ मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह, नांद, दिना, पोथरा, गोसेखुर्द टप्पा १, व बावनथडी प्रकल्प कोरडे पडले आहेत.वर्ष        मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा (१३ जून रोजी)२०१९ - १८३.७८ दलघमी२०१८ - ४०५ दलघमी२०१७ - ३०३ दलघमी२०१६ - ६७६ दलघमी२०१५ - ७०९ दलघमी२०१४ - १४४२ दलघमी

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई