लकडगंजमधील किराणा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:07 IST2021-09-13T04:07:50+5:302021-09-13T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजूबाजूची दोन दुकाने फोडून चोरट्यांनी ८ लाख, ८ हजारांची रोकड चोरून नेली. मस्कासाथ, नेहरू ...

The grocery store in Lakdaganj was blown up | लकडगंजमधील किराणा दुकान फोडले

लकडगंजमधील किराणा दुकान फोडले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आजूबाजूची दोन दुकाने फोडून चोरट्यांनी ८ लाख, ८ हजारांची रोकड चोरून नेली. मस्कासाथ, नेहरू पुतळा किराणा ओळीत घडलेली ही धाडसी चोरीची घटना रविवारी सकाळी उघड झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

आकाश मोहन अडवाणी (वय २६, रा.तुलसीनगर) यांचे लकडगंजमधील नेहरू पुतळा भागात शंकर ट्रेडिंग नामक किराणा आणि सुकामेवा विक्रीचे दुकान आहे. बाहेरगावी गेल्यामुळे अडवाणी यांच्या दुकानातील दोन दिवसांच्या व्यवहाराची सुमारे ८ लाख, १ हजारांची रोकड गल्ल्यातच ठेवून होती. शनिवारी रात्रीनंतर चोरटा शटर वाकवून दुकानात शिरला. त्याने ही रोकड, तसेच बाजूच्या किराणा दुकानातील ७ हजार असे एकूण ८ लाख, ८ हजार रुपये लंपास केले. पहाटे ४ वाजेपर्यंत चोरटा दुकानात होता. त्याच्या एकूणच वर्तनावरून त्याला या भागाचीच नव्हे, तर दुकानाचीही चांगली माहिती असावी, असा संशय आहे. दरम्यान, भल्या सकाळी या धाडसी चोरीचे वृत्त व्यापाऱ्यांमध्ये पसरले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अडवाणी यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. या चोरीत चोरट्याचे अन्य साथीदार असावे आणि ते बाहेर निगराणी करीत असावे, असा संशय आहे. अत्यंत वर्दळीच्या परिसरात झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

----

Web Title: The grocery store in Lakdaganj was blown up