किराणा दुकानदाराची हत्या

By Admin | Updated: September 7, 2015 02:58 IST2015-09-07T02:58:17+5:302015-09-07T02:58:17+5:30

म्हाळगीनगरातील संजय रामरावजी मोंढे (वय ४५) नामक किराणा दुकानदाराची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

Grocery shopkeeper murdered | किराणा दुकानदाराची हत्या

किराणा दुकानदाराची हत्या

नागपूर : म्हाळगीनगरातील संजय रामरावजी मोंढे (वय ४५) नामक किराणा दुकानदाराची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
हुडकेश्वरमधील रेणुकामाता नगर रस्त्याच्या बाजूला संजय मोंढे शनिवारी सकाळी मृतावस्थेत आढळले होते. त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. संजय नत्थुजी मानकर (वय ४०, रा. जुनी वस्ती झिंगाबाई टाकळी) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात मोंढे यांचा गळा आवळून हत्या झाल्याचे नमूद केले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मोढे यांचे किराणा दुकान आहे. त्यांना दारूचे व्यसन आहे. मारेकऱ्यांनी दारूच्या नशेत त्यांचा घात केला असावा, असा संशय आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Grocery shopkeeper murdered