विलासराव देशमुख यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:07+5:302021-05-27T04:09:07+5:30

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना ७६ व्या जयंतीनिमित्त नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे ...

Greetings to Vilasrao Deshmukh | विलासराव देशमुख यांना अभिवादन

विलासराव देशमुख यांना अभिवादन

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना ७६ व्या जयंतीनिमित्त नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शहरातील सर्व १५ ब्लॉकमध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात डॉ. गजराज हटेवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोतीराम मोहाडीकर, अब्दुल शकील, गोपाल पटम उपस्थित होते. पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, राजेश पौनीकर, दक्षिणमध्ये प्रवीण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, दक्षिण-पश्चिममध्ये पंकज थोरात, रजत देशमुख, पंकज निघोट तर पश्चिम व उत्तरमध्ये राजकुमार कमनानी, देवेंद्र रोटेले, प्रमोद ठाकूर, सूरज आवळे, ईरशाद मालिक, सुनीता ढोले यांनी आपापल्या प्रभागामध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले.

शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर व राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला. त्यांनी राजकारणात नेहमी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानले व लोकहितार्थच निर्णय घेतले, असे प्रतिपादन ठाकरे यांनी केले.

Web Title: Greetings to Vilasrao Deshmukh