सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

By Admin | Updated: January 24, 2016 02:46 IST2016-01-24T02:46:06+5:302016-01-24T02:46:06+5:30

भारतीय स्वतंत्रता संग्रामाच्या लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान इतिहासात अजरामर असे आहे.

Greetings to Subhash Chandra Bose | सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

नागपूर : भारतीय स्वतंत्रता संग्रामाच्या लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान इतिहासात अजरामर असे आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रज सरकारला धडकी भरविणाऱ्या नेताजींनी देशातच नाही तर परदेशातही भारतीयांच्या संघटना स्थापन करून स्वांतत्र्याचा लढा लढला. शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्यांना अभिवादन केले.
हिंदू महासभा
हिंदू महासभेच्या नागपूर महानगर शाखेतर्फे शनिवारी शाखेच्या कार्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अरुण जोशी यांनी नेताजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. इंग्रजांना हादरविणाऱ्या नेताजींच्या कट्टर राष्ट्रभक्ती आणि साहसी ध्येयाबद्दल सुभाषबाबू कायम स्मरणात राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष मुडे यांनी केले. अनंत पाध्ये यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. रेल्वेस्टेशन रोड, मानव चौक येथील नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनिल हिवरकर, ईश्वर बाळबुधे, महिंद्र भांगे, संजय शेवाळे, चरणजितसिंग चौधरी, अशोक आडिकणे, शैलेंद्र तिवारी, नरेंद्र पुरी, रिजवान अन्सारी, आशिष नाईक, दिनकर वानखेडे, शाबीर शेख, अब्दुल कादीर शेख, शहबाज खान, रुद्र ढाकळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शहर काँग्रेस सेवादल
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने नेताजींना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, शंकरलाल बैसवारे, स्मिता कुंभारे, वासुदेव महल्ले, रत्नमाला फोपरे, सुरेश भोयर, फुलवंती साखरे, गोविंदा उरकु डे, शुभांगी स्वामी, रतनलाल रंगारी, लता पारपिल्लेवार, प्रभुदास तायवाडे, सुनीता शेंडे, गंगाधर नागपुरे, विद्युलता उके, अरुण अनासाने, बबनराव दुरुगकर, विठ्ठल दांडेकर आदींचा सहभाग होता.
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी
गोधनी येथील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जयंती कार्यक्रमाला माजी मंत्री अनिस अहमद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. सलीमुद्दीन फारुकी, लोणारा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य शरद भांडारकर, डॉ. आरिफ खान, फारुक हसन, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य विनय मानकर, प्रा. मो. बाबर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य फारुकी यांनी केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विजयालक्ष्मी सोळंकी यांनी आभार मानले.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे सुरेश भगत, प्रमोद जोंधुळकर, जॉन मॅथ्यु व इतर अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Greetings to Subhash Chandra Bose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.