शाहू महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST2021-06-28T04:07:34+5:302021-06-28T04:07:34+5:30

बहुजन रिपब्लिकन एकता मंच () बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने सीताबर्डी येथील कार्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात ...

Greetings to Shahu Maharaj | शाहू महाराज यांना अभिवादन

शाहू महाराज यांना अभिवादन

बहुजन रिपब्लिकन एकता मंच ()

बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने सीताबर्डी येथील कार्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. बरिएमच्या संयाेजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यक्रमात धंताेली झाेनच्या सभापती वंदना भगत, मंचचे जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे यांनी अभिवादन केले. यावेळी रत्नमाला मेश्राम, विशाखा कांबळे, हेमराज टेंभुर्णे, नरेंद्र चव्हाण,आनंद नाईक, पवन पिंपळखेडे, राजू मेश्राम, सुनीता गजरे, ललित चिमोटे, जोशना धाबडे,प्रफुलता बनसोड, स्वाती काळे, विजय जनबंधू, प्रवीण साळवे उपस्थित होते.

सर्वजन विकास पार्टी

छत्रपति शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सर्वजन विकास पार्टीतर्फे अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी विश्वकर्मा शिल्पकार समाजाच्या एकिकरणाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा व तालुका स्तरावर पार्टीचे पदाधिकारी नेमण्याबाबत चर्चा झाली. नागपुर झोनचे अध्यक्ष शंकर चुरागले यांच्या नेतृत्वात तसेच रमेश बरगट यांच्या अध्यक्षतेत सभा झाली. प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. रमेश गाण यांनी केले. यावेळी विष्णुपंत मोरेकर, गजानन देउळकर, मनिष मानुसमारे, अरुण पाटमासे, अविनाश बोंद्रे, नागपुर जिल्हा महिला प्रभारी संध्या कोसे, शहर महिला अध्यक्ष अर्चना कोसे आदी उपस्थित हाेते. संचालन मधुकर खंडाळकर यांनी व प्रकाश काळे यांनी आभार मानले.

Web Title: Greetings to Shahu Maharaj