सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:58+5:302021-03-13T04:12:58+5:30
रामटेक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ...

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
रामटेक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने खैरी (ता. रामटेक) येथील प्रबुद्ध बुद्ध विहारात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकुमार खोब्रागडे, तर प्रमुख अतिथी मनीष खोब्रागडे उपस्थित होते. लक्ष्मी खोब्रागडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समतादूत राजेश राठोड यांनी तरुणांना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनीही मार्गदर्शन केले. शिवाय, खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतींतर्गत युवा केंद्राची स्थापना करण्यात आली. यासाठी तन्मय खोब्रागडे, मयुरी मेश्राम, संघर्ष मेश्राम, पलाश खोब्रागडे, निशांत खोब्रागडे, आदित्य खोब्रागडे, अभय राऊत व सतीश कोचे या तरुणांचे युवा केंद्रात नामांकन करण्यात आले.