त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:10+5:302021-02-08T04:08:10+5:30
रमाई जयंती निमित्त चर्चासत्र () संथागार फाऊंडेशन आणि महिला क्रांती समितीच्यावतीने रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात चर्चासत्र ...

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना अभिवादन
रमाई जयंती निमित्त चर्चासत्र ()
संथागार फाऊंडेशन आणि महिला क्रांती समितीच्यावतीने रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात चर्चासत्र आयाेजित करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी, शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे नसून, ते देशातील सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. सरोज आगलावे, डॉ. संध्या पवार उपस्थित होत्या. डॉ. सरोज आगलावे म्हणाल्या की, 'आज आपल्याकडे सत्ता, संपत्ती नाही, परंतु लोकशक्ती आहे. त्या बळावर आपण संघर्ष करून आपले प्रश्न सोडू शकतो.’ प्रास्ताविक माधव जांभुळे यांनी केले. पुष्पा बौद्ध यांनी भूमिका मांडली. संचालन प्रा. विशाखा कासारे यांनी केले. ममता बोदीले यांनी आभार मानले. आयाेजनात प्रा. माधुरी गायधनी, डॉ. एम.एस. वानखेडे, डॉ. वीणा राऊत आदींचा सहभाग हाेता.
महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्था
महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने रमाई यांच्या जयंतीनिमित्त नि:शुल्क नेत्रतपासणी शिबिर भीमज्योती बुद्धविहार, हिवरीनगर येथे आयोजित करण्यात आले. याप्रसंगी हरीश रामटेके, राजेश खांडेकर, गिरीधर धोंगडे, सारिका ताटे, इंद्रजित वासनिक, अनिकेत शेंडे, राहुल मोरे, वनमाला खांडेकर, सुधा जैन, विजया मेश्राम, माया तांबे, शोभा पाटील, लक्ष्मण हुमने प्रामुख्याने उपस्थित हाेते. संचालन संस्थेचे सचिव मुकेश मेश्राम यांनी केले. सुरेखा मेढे यांनी आभार मानले. आयाेजनात नमित तागडे, पलाश मेश्राम, क्षितिज मेश्राम आदींचा सहभाग हाेता.