भाई कोतवाल, हिराजी पाटील पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:30+5:302021-01-04T04:07:30+5:30
नागपूर : नाभिक युवा शक्ती नागपूर शाखेच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात ...

भाई कोतवाल, हिराजी पाटील पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
नागपूर : नाभिक युवा शक्ती नागपूर शाखेच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. क्रांतिवीर भाई कोतवाल चौक येथे असलेल्या स्मारकाला भाईच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी गिरीश पांडव, तर प्रमुख पाहुणे प्रदेशाध्यक्ष अमोल तळखंडे होते. सरचिटणीस प्रवीण चौधरी, समीर शेख, नामदेव पारधी, पिंटू खुर्गे, अमोल ठमके, कृष्णा खिर्डेकर, अनवर शेख, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. रवींद्र शेंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्याध्यक्ष सुशील अनेराव यांनी आभार मानले. यावेळी मामा राऊत, गोपाल कडुकर, गणेश वाटकर, नसिम शेख, गणेश वाटकर, विश्वनाथ सेन, शैलेश चन्ने, प्रताप मेश्राम, उमेश मिरासे, चंदू दहेनकर, आदी उपस्थिती होते.