नामांतर शहीद भीमसैनिकांना अभिवादन
By Admin | Updated: January 16, 2017 02:10 IST2017-01-16T02:10:13+5:302017-01-16T02:10:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त इंदोरा चौक दहा नंबर पूल येथील नामांतर शहीद स्मारक

नामांतर शहीद भीमसैनिकांना अभिवादन
नामांतर दिन : विविध संघटना, कार्यकर्त्यांनी वाहिली आदरांजली
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त इंदोरा चौक दहा नंबर पूल येथील नामांतर शहीद स्मारक येथे विविध आंबेडकरी संघटना, राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने संविधान चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नामांतर आंदोलनातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी बरिएमच्या वंदना भगत, भीमराव फुसे, भरत जवादे, अशोक नगरारे, युवराज फुलझेले, नरेंद्र चव्हाण, नंदा गोडघाटे, जया पानतावणे, लीला आंबुलकर, कांता ढेपे, शकुंतला पाटील आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)
खोरिपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वात इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकावर पुष्प अर्पण करून शहीद भीम सैनिकांना मानवंदना अर्पण करण्यात आली.यावेळी खोरिपचे ज्येष्ठ नेते आर.पी. भिडे, सतीश मेश्राम, प्रा. प्रल्हाद गजबे, सूर्यभान शेंडे, रामलाल सोमकुवर, नितीन साखरे, डी.डी. बन्सोड, गुलाब नंदेश्वर, जी.एस. कावळे, डॉ. सुनील वाघमारे, शिशुपाल टिपले, सिद्धार्थ पाटील, विशाल सरोजकार, सुखदेव कांबळे, रवी पाटील, अरुण कोटांगळे, बाबुराव चंदनखेडे, सुदर्शन मून, महेश ठवरे, दिलीप बावरिया, अतुल चौरे आदी उपस्थित होते.
उत्तर नागपूर विकास आघाडी
उत्तर नागपूर विकास आघाडी, सहयोग मित्र परिवार यांच्यातर्फे इंदोरा चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नामांतर शहीद स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली. शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले. अनिल वासनिक यांच्या नेतृत्वात अनिल मेश्राम, ओमप्रकाश मोटघरे, कविराज बोरकर, अरुण गायकवाड, अर्जुन सवाईमूल, राजन टेंभुर्णे, श्रीराज गजभिये, दिनेश खोब्रागडे, धम्मपाल वंजारी, रमेश ढवळे, लहानू बन्सोड, उदाराम वाघमारे, मोना चौधरी, दिलेश मेश्राम, ममता राऊत, प्रीती रामटेके, अनिल शेंडे, संध्या कापसे, रवि वंजारी, पुरुषोत्तम जांगडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन मुव्हमेंट
नामांतर दिनानिमित्त रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे इंदोरा चौक येथील शहीद नामांतर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांच्या नेतृत्वात अमन सोनटक्के, डॉ. विनोद डोंगरे, पृथ्वी गोटे, प्रभाकर ढोक, बबन लोखंडे, अरुण गडलिंग, राजू गणवीर आदी उपस्थित होते.
दीक्षाभूमी स्मारक समिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्या नेतृत्वात नामांतर शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी कैलास वारके, देवाजी रंगारी, शरद मेश्राम, मिलिंद थूल, शैलेश डोंगरे आदी उपस्थित होते.