महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:13+5:302021-04-13T04:07:13+5:30
नागपूर : महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व दीनदुबळ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ वी जयंती शहरात ...

महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
नागपूर : महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व दीनदुबळ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ वी जयंती शहरात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटनांतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ()
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा पश्चिम नागपूरच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शहराध्यक्ष रमेश चोपडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पश्चिम नागपूर अध्यक्ष नरेश बरडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी नगरसेविका साधना बरडे, सुरेश कोंगे, सुरेश काळभूत, अतिपसिंग, चिंतामण कान्हेरे, अभय खोरगडे, जगदीश विरखेडे, बाबूराव लांजेवार उपस्थित होते.
--------------
कास्ट्राईब कर्मचारी संघटना
नागपूर : कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी परिसरातील कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे होते. प्रास्ताविक नरेंद्र धनविजय यांनी केले. आभार सुभाष गायकवाड यांनी मानले. यावेळी डॉ. सोहन चौरे, रमेश निकोसे, गॅब्रीयल, चंदन चवरिया, दिलीप चौरे, अजय वानखेडे, सुनील विघ्ने, प्रेमदास बागडे उपस्थित होते.
----------