भिवापूर येथे महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST2020-12-07T04:06:07+5:302020-12-07T04:06:07+5:30

भिवापूर : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक‌ समिती येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना व डॉ. ...

Greetings to Mahamanwala at Bhivapur | भिवापूर येथे महामानवाला अभिवादन

भिवापूर येथे महामानवाला अभिवादन

भिवापूर : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक‌ समिती येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष तुलाराम जांभुळकर, उपाध्यक्ष कौतुका धनविजय, लव जनबंधू, किरण नागरीकर, वंदना जांभुळकर, अर्चना मोटघरे, विश्वनाथ जांभुळकर, किसनाबाई मेश्राम, प्रशांत गायकवाड, सुगल वाघमारे, राकेश थुलकर आदी उपस्थित होते.

----

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती महादुला

कोराडी : महादुला कोराडी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महादुला येथील मंदिर टी-पॉईंट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य नाना कंभाले, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, माजी सभापती सचिन मानवटकर, संजय रामटेके, प्रवीण मेश्राम, ईशांत मानवटकर, आकाश रंगारी, संतदास सारवा, संदीप खोब्रागडे, विशाल वासनिक, आशिष जरवार, सिद्धार्थ खोब्रागडे, कैलास शेंडे आदी उपस्थित होते.

----

ग्रामपंचायत बोखारा

कोराडी : बोखारा ग्रामपंचायतच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच अनिता पंडित यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

---

पंचशील बुद्धविहार माेवाड

माेवाड : येथील पंचशील बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पेश गजबे, सुवर्णा सहारे, सविता कठाणे, आम्रपाली बागडे, मनीषा पाटील, दिनेश काठाणे, अनिल ढोके, सुधा सहारे, सुनंदा गजबे आदींसह नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: Greetings to Mahamanwala at Bhivapur