महामानवाला अभिवादन......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST2020-12-06T04:09:37+5:302020-12-06T04:09:37+5:30

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महासंघाचे अध्यक्ष ...

Greetings to Mahamanwala ...... | महामानवाला अभिवादन......

महामानवाला अभिवादन......

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम हाेइल.

ड्रॅगन पॅलेस, कामठी

कामठीतील ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशाेधन केंद्र येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक आयाेगाच्या सदस्या ॲड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी ओगावा साेसायटी, ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन विपश्यना सेंटर, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बहुजन रिपब्लिकन एकता मंच

बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे संविधान चाैक येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. मंचच्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हाेइल. दीक्षाभूमीवरही अभिवादन करण्यात येईल.

आयएएस डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून तलविहार संगीत संस्था तसेच राष्ट्रनिर्माता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार महाेत्सव समितीच्या वतीने भीमांजली कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येत आहे.

Web Title: Greetings to Mahamanwala ......