विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:13 IST2017-10-03T01:13:31+5:302017-10-03T01:13:49+5:30

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपआयुक्त संजय धिवरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Greetings to the departmental commissioner's office | विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपआयुक्त संजय धिवरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक आयुक्त भुगावकर, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, तहसीलदार कपील हाटकर, प्रमोद जांभुळकर, जॉन मॅथ्यू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विजया बनकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to the departmental commissioner's office