छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
By Admin | Updated: March 16, 2017 02:37 IST2017-03-16T02:37:03+5:302017-03-16T02:37:03+5:30
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाल येथील छत्रपतींच्या पुतळ््याजवळ सकाळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
शिवसेनेच्या वतीने शिवसेना नागपूर जिल्हा कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्यांहस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी हरडे यांनी पक्षाच्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून जनहितार्थ कार्य करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. महाल येथील महाराजांच्या प्रतिमेला सुद्धा माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी शहर संघटिका सुरेखा खोब्रागडे, मंगला गवरे, सुरेखा घोरपडे, डॉ. रामचरण दुबे, चंद्रकांत राऊत, ओंकार पारवे, शरद सरोदे, रवनीश पांडे, किशोर पराते, अंकुश कडू, संजय कसोधन, मनोज शाहू, नरेंद्र मगरे, गुड्डू रहांगडाले, मालती मामीडवार, कल्पना शर्मा, सुषमा शिंदे, सुनिल बॅनर्जी, मुन्ना तिवारी, चंद्रकांत कावळे, उमेश निकम, लालाजी हांडे, गुलाबराव भोयर, चित्रा भोयर, नीलिमा उमाठे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)