बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मनपातर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST2021-09-26T04:09:30+5:302021-09-26T04:09:30+5:30

नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तथा राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी ...

Greetings from Barrister Rajabhau Khobragade | बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मनपातर्फे अभिवादन

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मनपातर्फे अभिवादन

नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तथा राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी मनपातर्फे इंदोरा चौक येथील बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या पुतळ्याला उपमहापौर मनीषा धावडे, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका मंगला लांजेवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगरसेवक प्रल्हाद दुर्गे यांच्यासह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

...

खोब्रागडे यांना भाजपतर्फे अभिवादन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी इंदोरा चौक येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शंकर मेश्राम, भाजप अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष बाळा घरडे, विराग राऊत, रोहन चांदेकर, आनंद अंबादे, अशोक डोंगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings from Barrister Rajabhau Khobragade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.