बाबू हरिदास आवळे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:42+5:302021-03-04T04:13:42+5:30
------------------- दहावी, बारावीची परीक्षा स्थगित करा नागपूर : पश्चिम नागपूर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष रिजवान खान रुमवी यांच्या नेतृत्वात ...

बाबू हरिदास आवळे यांना अभिवादन
-------------------
दहावी, बारावीची परीक्षा स्थगित करा
नागपूर : पश्चिम नागपूर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष रिजवान खान रुमवी यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांची भेट घेऊन कोरोना संक्रमणामुळे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात नितीन माहुरे, सत्यम सोडगीर, करुणा घरडे, सिद्धार्थ घरडे, सुकेशिनी डोंगरे, जुबैर शेख आदी उपस्थित होते.
----------------
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा विरोध
नागपूर : प्रदेश युवक काँग्रेसने शहरातील विविध पेट्रोल पंपांवर आंदोलन करून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर दरवाढीचा विरोध केला. प्रदेश युवक काँग्रेस सचिव केतन ठाकरे व फजलुर्रहमान कुरैशी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सदर दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकारचे त्याकडे लक्ष नाही, असे कुरैशी यांनी सांगितले. आंदोलनात रिजवान रुमवी, लव मसराम, युनूस खान, नकील अहमद आदी उपस्थित होते.
--------------
बोअरवेल दोन वर्षापासून बंद
नागपूर : मॉडेल मिल परिसरातील बोअरवेल गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना लांबून पाणी आणावे लागत आहे. पाणी पाईपलाईन नसल्यामुळे नागरिक बोअरवेलवर अवलंबून आहेत. याशिवाय परिसरातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
---------------
रोडवर मोकाट जनावरांचा हैदोस
नागपूर : कॅनल रोड सतत व्यस्त असतो. या रोडने रोज हजारो वाहने जाणे-येणे करतात. रोडवरील हॉटेल व चहाटपरी चालक वाचलेले अन्नपदार्थ उघड्यावर टाकतात. त्यामुळे मोकाट जनावरे या रोडवर हैदोस घालतात. परिणामी, वाहतुकीला अडचण निर्माण होते. बरेचदा वाहतूक कोंडी होते. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अपघात होण्याची भीती असते. प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
-----------
चौधरी झाले उपजिल्हाध्यक्ष
नागपूर : शिवसेनेशी संलग्नित भारतीय कामगार संघटनेच्या उपजिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बंटी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाध्यक्षांनी नियुक्तीपत्र दिले आहे.