शहराबाहेर नाही जाणार ग्रीनबस
By Admin | Updated: May 23, 2015 02:46 IST2015-05-23T02:46:43+5:302015-05-23T02:46:43+5:30
पथदर्शी प्रकल्प म्हणून इथेनॉलवर धावणारी ग्रीनबस शहरात चालविण्याचा महापालिकेसोबत करार करण्यात आला होता. परंतु मागील सहापैकी अडीच महिने ही बस शहराबाहेर होती.

शहराबाहेर नाही जाणार ग्रीनबस
नवीन करारात अट : सहा महिन्यात अडीच महिने बस शहराबाहेर
नागपूर : पथदर्शी प्रकल्प म्हणून इथेनॉलवर धावणारी ग्रीनबस शहरात चालविण्याचा महापालिकेसोबत करार करण्यात आला होता. परंतु मागील सहापैकी अडीच महिने ही बस शहराबाहेर होती. त्यामुळे स्कॅनिया कंपनीने पुन्हा ही बस सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याची अनुमती मागितली होती. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही अनुमती दिली अहे. परंतु सोबतच नवीन करारात अट समाविष्ट केल्याने आता ग्रीनबस शहराबाहेर जाणार नाही.
१० ते १९ फेब्रुवारी २०१५ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लखनौ येथे इथेनॉल बस चाचणीसाठी मागितली होती. त्यानंतर ९ मार्च ते १५ मे २०१५ या कालावधीत ही बस शहराबाहेरच होती. ही बस बंगरूळ, अहमदाबाद व मुंबई शहरात होती. त्यानंतर ही बस नागपुरात परतली. अडीच महिने ही बस शहराबाहेर असल्याने प्रायोगिक कालावधी ठराविक कालावधीत पूर्ण करता आला नाही. त्यामुळे हर्डीकर यांनी या कंपनीला नोटीस बजावली आहे. १६ ते २१ मे दरम्यान रिझर्व्ह बँक ते खापरी दरम्यान ही बस १९२.५ कि.मी. धावली. दररोज १४ फेऱ्या होत आहेत. यासाठी १४३ लिटर इथेनॉल लागले. १.३४ लिटर इथेनॉलमध्ये ही बस १ किलोमीटर धावते. कंपनील प्रति कि.मी. १७.९२ रुपये उत्पन्न होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी याच्या प्रयत्नातून महापालिकेला पथदर्शी प्रकल्प म्हणून ही बस मिळाली मिळाली आहे. परंतु इथेनॉलचा पर्यायी इंधनात समावेश नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या परवानगीसाठी या बसला काही दिवस प्रतीक्षा करावी लागली होती. (प्रतिनिधी)