शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चोहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 8:51 PM

कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे दिसताहेत निसर्गाच्या अद्भूत छटा

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘‘ऐसे गजबले रस्ते, गर्दीच गर्दी चोहीकडे,ध्वनी-धुळीच्या मापदंडात, वृक्षवेली-पशूपक्षी सारेच काळवंडले!’’... अशी स्थिती ऐरवी सर्वत्र दिसून येते. कुणालाच कुणाची फिकीर नाही. प्रत्येकच जण आपल्याच गरजांच्या व्यस्ततेत गुंतलेले असतात. शहरात असणाऱ्यांना आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवाकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही तेथे वृक्षवेली-पशूपक्षी यांच्या अस्तित्त्वाचे काय देणे-घेणे असणार! माणूस जन्मला काय की मेला काय, आपल्याशिवाय आपल्या गरजांशिवाय निसर्गही आहे, याचे भान त्याला मुळीच नाही. त्याला भानावर आणण्याची किमया एका दूष्ट दैत्याने केली. कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.ऐरवी रस्ते गजबजलेले असतात. गाड्यांचा आवाज, हॉर्नचे कर्णकर्कश स्वर, सायलेन्सरमधून निघणारा काळाशार धूरात सगळेच माखलेले असतात. दिवसभर राबराबून घरी गेल्यावर मनुष्य स्वत:ला स्नान घालतो आणि मळ दूर करतो. घरात निवांत बसून दिवसभराचा गोंगाट शमवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पशू-पक्ष्यांना शहरात मानवासारखी ही सुविधा नाही. पाणी नाही, जंगल नसल्याने त्यांना स्वत:चे घर नाही. वृक्षवेलींचेही तसेच. शहरात अधामधात कुठेतरी उगवलेल्या या वृक्षांना महिनोनमहिने तोच गोंगाट सतत सहन करावा लागतो तर प्रदुषणाच्या धुराचे आवरण पानफुलांवर आच्छादलेले असतात. ही धूळ स्वच्छ करण्यासाठी या वृक्षवेलींना पावसाची चातकासारखी प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, कोरोनामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या लॉकडाऊनने वृक्षवेली-पशूपक्ष्यांना जणू संजीवनीच दिली आहे. माणसाने स्वत:ला कोंडून घेतले आहे. माणूस घरात दडपून बसल्याने गाड्या रस्त्यावर उतरत नाही आणि म्हणून निसर्गाला मोकळा श्वास घेता येत आहे. रस्त्यांवरील निरव शांततेने गोंगाड कधीचा पळाला आहे. शहर स्वच्छ असल्याचे दिसायला लागले आहे. जणू शांघाय, सिंगापूर नागपुरातच अवतरले आहे, असे सौंदर्य शहराचे दिसायला लागले आहे. वृक्षांची पानेफुले प्रदुषणमुक्तीचा आस्वाद घेत आहेत. ऐरवी प्रदुषणामुळे वृक्षवेलींची हिरवी पानेही डांबरासारखी भासत होती. आता मात्र ती स्वत:च्या अस्सल हिरव्याकंच रंगात रंगलेली आहेत. वृक्षवेलींच्या याच पाना-फुलांवर हुंदडणाºया पक्षांना प्रदुषण ओसरल्याने शुद्ध भोजन आणि रसग्रहण करता येत आहे. पक्षीच नव्हे तर मधूमक्षीकेसारख्या छोट्या किटकांनाही शुद्धतेचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे कदाचित या काळात निर्माण झालेले मधही अतिशय शुद्ध असेल. चिमण्यांच्या चिवचिवाटाचे तरंग वातावरणात उसळी मारत आहेत आणि इतका स्वच्छ स्वर शहरी माणूस प्रथमच ऐतक आहे. प्रदुषणमुक्तीमुळे निरभ्र झालेल्या आकाशात पांढºया शुभ्र ढगांना छेद देत संध्याकाळी आपल्या घरट्यांकडे परतणारे पक्षांचे थवे आल्हाद देत आहेत. कुत्री, गार्इंचे घोळक्यांच्या असण्याचा वेगळाचा आभास मानवाला घेता येत आहे. पुस्तकांच्या पानात वाचलेल्या कोकीळेचा आवाज प्रत्येकाच्या कर्ण इंद्रियेतून हृदयातचा ठाव घेत आहे. ‘कुहू कुहू’ हा कोकीळ स्वर कधी कुणी ऐकलाय का? नसेल ऐकला तर तो या काळात कर्णपटलांवर पडत असल्याचा अनुभव घेता येतो. इवलीशी खारूताई बघता येत आहे. रस्ते निरव असल्याने रस्त्याच्या कडेने असलेल्या वृक्षांच्या सावलीत ती निवांत दाणा खुडताना दिसत आहे. एकूणच.. कोरोना नावाची महामारी संपूर्ण मनुष्य समाजाला घातक ठरत असली तरी त्या भयाने मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेले आहे.‘‘नाही गजबजलेले रस्ते, निरव शांतता सगळीकडेगोंगाट नाही-धुळ नाही, आल्हाद अवतरले चोहीकडे’’... निसर्गाची ही रया कायम ठेवण्यासाठी, कोरोना प्रकरणातून माणूस धडे घेईल का, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या