ग्रीन स्पेस इन्फ्राची ग्रीन सिटी-४ स्कीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:51+5:302021-06-20T04:06:51+5:30

- बुकिंग सुरू : दोन आणि तीन बीएचके फ्लॅट नागपूर : - वाणिज्य बातमी ..१० बाय ३ .. फोटो ...

Green Space Infra's Green City-4 Scheme | ग्रीन स्पेस इन्फ्राची ग्रीन सिटी-४ स्कीम

ग्रीन स्पेस इन्फ्राची ग्रीन सिटी-४ स्कीम

- बुकिंग सुरू : दोन आणि तीन बीएचके फ्लॅट

नागपूर :

- वाणिज्य बातमी ..१० बाय ३ .. फोटो ..

- महाबुकिंग एक्स्पो सुरू : दोन आणि तीन बीएचके फ्लॅट

नागपूर : ग्रीन सिटी १, २ आणि ३ च्या यशानंतर रिअल इस्टेट कंपनी ग्रीन स्पेस इन्फ्राव्हेंचर्सने नवरात्रीनिमित्त ग्रीन सिटी-४ लॉन्च केली होती. आता या नवीन स्कीममध्ये दोन बीएचके आणि तीन बीएचके फ्लॅट उपलब्ध आहेत. बेसा-घोगरी रोडवर इंटरनॅशनल स्कूलसमोर, गोटाळपांजरी येथील ग्रीन सिटी-४ मध्ये बांधकाम वेगात सुरू आहे.

ग्राहकांचा प्रतिसाद पाहता कंपनीने १८ ते २७ जूनपर्यंत महाबुकिंग एक्स्पो सुरू केला असून ११ हजार रुपयांची रिफंडेबल रक्कम अदा करून स्वप्नातील घराचे बुकिंग करता येईल. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेत २.६७ लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे. बुकिंग एक्स्पो टी-०७/ई-४ अक्षय हाईट २, फेडेक्सच्या बाजूला, ओमनगर, बेलतरोडी सिमेंट रोड येथे सुरू आहे. दोन बीएचके फ्लॅट सर्व खर्चासह २२.५० लाख आणि तीन बीएचके २७ लाख रुपयांत उपलब्ध आहेत.

रेरातर्फे नोंदणीकृत प्रकल्पात पूर्वीच्या प्रकल्पाप्रमाणे क्लब हाऊस, कम्युनिटी गार्डन, चिल्ड्रेन प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक, जीम, पॉवर बॅकअप, टेनिस कोर्ट आणि सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीयकृत बँकांतर्फे ९५ टक्के फायनान्स सुविधा आहे. खरेदीपूर्वी साईट पाहण्याची सोय आहे. याशिवाय ग्रीन सिटी-३ मध्ये वर्धा रोडवर सहारा सिटीमागे, दोन बीएचकेचे रेडी पझेशन फ्लॅट १८.२५ लाख रुपयांत आहेत. ग्रीन स्पेस क्रेडाईचे सदस्य आहेत. प्रकल्पाचे आर्किटेक्ट लुनियाज एक्शियल प्लानर्स आहेत. (वा.प्र.)

Web Title: Green Space Infra's Green City-4 Scheme