शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
3
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
4
‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
5
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
6
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
7
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
8
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
9
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
10
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
11
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
12
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
13
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
15
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
16
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
17
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

मेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 22:47 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हरित पाऊल टाकत सांडपाण्याच्या पुन्हा उपयोगासाठी बायो-डायजेस्टर टॅन्क आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे.

ठळक मुद्देदररोज ८०० ते ९०० लिटर पाण्याची बचत

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हरित पाऊल टाकत सांडपाण्याच्या पुन्हा उपयोगासाठी बायो-डायजेस्टर टॅन्क आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे. यात डीआरडीओ पेटंट टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने विशेष जीवाणूंच्या साहाय्याने सांडपाण्याचे पूर्णपणे स्वच्छ पाण्यात रूपांतरण होते. प्रायोगिक स्तरावर नागपूर मेट्रोच्या रिच-१ मार्गावरील खापरी, न्यू-एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट या तीन स्टेशनवर सध्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा उपयोगात आणले जात आहे.एनएमआरपीने काही अद्यावत तंत्रज्ञासह केवळ बायो-डायजेस्टर आणि रीड बेड तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करीत आहेत. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने स्टेशन आणि डेपोमध्ये वापरले जाते. या प्रक्रियेमुळे प्रत्येक वेळेस नव्याने लागणाऱ्या पाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे ३० टक्के म्हणजेच प्रत्येक स्टेशनवर दरदिवशी सुमारे ८०० ते ९०० लिटर पाण्याची बचत होत आहे. मोजक्या जागेत कमीत कमी खर्चात पारंपारिक पद्धतीने वॉटर रिसायकलिंगची प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेमुळे इतरत्र कुठेही सांडपाणी जमा राहण्याची शक्यता नाही. यासाठी विजेची गरज नसून यामुळे पाण्यासह खर्चात बचत होते.झिरो लिक्विड डिस्चार्जची पर्यावरणविषयक बांधिलकी जपण्यासाठी महामेट्रोने नागपूर मेट्रो प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पात सदर प्रक्रिया राबविण्यासाठी महामेट्रो आणि डीआरडीओदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक सर्व तपासण्या महामेट्रोतर्फे आल्या आहेत. तर काही महत्त्वाच्या चाचण्या प्रयोगशाळेमध्ये करून प्रत्यक्ष अमलात आणली आहे. यामुळे नेहमीसाठी कमीत कमी खर्चात ही प्रक्रिया राबविणे सहज शक्य झाले आहे. पुढील काळात इतर स्टेशन आणि कार्यालयातदेखील या प्रणालीचा वापर होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोWaterपाणी