गाेठ्यातील नऊ गुरांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:33+5:302021-07-05T04:07:33+5:30

काेंढाळी : शेतातील गाेठ्यात कुणीही नसताना चाेरट्याने नऊ गुरे चाेरून नेली. ती गुरे दाेन शेतकऱ्यांच्या मालकीची असून, त्यांची किंमत ...

The grazing of nine cattle in the village | गाेठ्यातील नऊ गुरांची चाेरी

गाेठ्यातील नऊ गुरांची चाेरी

काेंढाळी : शेतातील गाेठ्यात कुणीही नसताना चाेरट्याने नऊ गुरे चाेरून नेली. ती गुरे दाेन शेतकऱ्यांच्या मालकीची असून, त्यांची किंमत २ लाख २० हजार रुपये असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा (साेनार) शिवारात शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.

प्रभुदयाल तेजराम शर्मा (८०) व नामदेव केशव मलवे (५०) दाेघेही रा. खापा (साेनार), ता. काटाेल यांची खापा (साेनार) शिवारात जवळजवळ शेती असून, दाेन्ही शेतात गाेठे आहेत. दाेघांच्याही मालकीची जनावरे त्या गाेठ्यांमध्ये नेहमीप्रमाणे बांधलेली हाेती. दरम्यान, मध्यरात्री शेतात कुणीही नसताना चाेरट्याने दाेन्ही गाेठ्यातील नऊ जनावरे चाेरून नेली. यात प्रभुदयाल शर्मा यांच्या दाेन गाई व दाेन कालवडी तसेच नामदेव मलवे यांच्या चार गाई व एक गाेऱ्हा अशा नऊ गुरांचा समावेश आहे. या सर्व जनावरांची एकूण किंमत २ लाख २० हजार रुपये असल्याचे दाेघांनीही पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: The grazing of nine cattle in the village