चरता चरता गाई पोहचल्या विमानतळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:12 IST2021-09-05T04:12:25+5:302021-09-05T04:12:25+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी ...

चरता चरता गाई पोहचल्या विमानतळावर
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी जनावरे जास्त प्रमाणात दिसून येतात. याशिवाय बेवारस कुत्र्यांमुळे प्रवाशांना अनेकदा असुविधांचा सामना करावा लागतो. विमानतळावरून जनावरे हटविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
जनावरे हटविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी मनपाकडे अनेकदा तक्रार केली आहे. पण विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत. मनपाची डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे अन्य जनावरे पकडण्याकडे दुर्लक्ष आहे. डुक्कर पकडण्याची सुविधा एका एजन्सीकडून नि:शुल्क मिळत आहे. विमानतळासह लगतच्या मिहान परिसरात म्हशींचे अवैध गोठे आहेत. विमानतळ ते खामलादरम्यान असलेल्या रस्त्यावरील गोठ्याचे मालक म्हशींना विमानतळाकडे चरण्यासाठी सोडत असल्याचे दिसून येत आहे.