शेतातील गाेठ्यातून जनावरांची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:15+5:302021-04-04T04:08:15+5:30
पारशिवनी : शेतातील गाेठ्यात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात आराेपीने चाेरून नेली. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड शिवारात ...

शेतातील गाेठ्यातून जनावरांची चाेरी
पारशिवनी : शेतातील गाेठ्यात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात आराेपीने चाेरून नेली. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड शिवारात शुक्रवारी (दि.२) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नंदकिशाेर शेषराव ठाकरे (२९, रा. करंभाड, ता. पारशिवनी) यांची करंभाड शिवारात शेती असून, शेतातील गाेठ्यात नेहमीप्रमाणे त्यांनी दाेन गाई, दाेन गाेऱ्हे व एक कालवड अशी पाच जनावरे बांधून ठेवली हाेती. दरम्यान, अज्ञात आराेपीने गाेठ्यातील एक गाय किंमत १२ हजार रुपये, १० हजाराचा एक गाेऱ्हा, तीन हजाराची एक कालवड व दाेन हजार रुपये किमतीचा एक गाेऱ्हा अशी एकूण २७ हजार रुपये किमतीची चार जनावरे चाेरून नेली. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास ठाकरे शेतात गेले असता, ही बाब लक्षात आल्याने त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार संजय शिंदे करीत आहेत.