शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी : भांडण करणाऱ्यांना हटकणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 20:04 IST

आपसात वाद घालणाऱ्यांना हटकणे एका व्यक्तीला मोठे महागात पडले. वाद घालणाऱ्या आरोपींनी चाकू हल्ला करून हटकणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देनागपुरातील शांतीनगरात थरार, तिघांना अटक, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपसात वाद घालणाऱ्यांना हटकणे एका व्यक्तीला मोठे महागात पडले. वाद घालणाऱ्या आरोपींनी चाकू हल्ला करून हटकणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यात दिनेश भोजराज शेटे (वय ४०, रा. लालगंज) हे गंभीर जखमी झाले.किशोर श्यामराव नंदनवार (वय ४०) हे पाचपावलीतील बांगलादेश नाईक तलाव परिसरात राहतात. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ते त्यांचा मावसभाऊ दिनेश शेटे यांच्याकडे भेटायला आले होते. यावेळी शेटे यांच्या घराशेजारी सार्वजनिक नळावर आरोपी गोलू ऊर्फ जगदीश राघोजी उमरेडकर, सचिन गोपीचंद भानुसे, नीलेश ऊर्फ भांजा सोनटक्के, रोशन नानोटकर आपसात वाद घालत एकमेकांना शिवीगाळ करीत होते. ते पाहून दिनेश शेटे यांनी त्यांना कशाला वाद घालता, असे म्हणून हटकले. त्यावर ‘तू आम्हाला हटकणारा कोण’, असे विचारत आरोपींनी त्यांना मारहाण केली. एवढेच नव्हे आरोपी गोलूने दिनेशच्या गळ्यात हात घातला आणि त्यांना बाजूला नेऊन त्यांच्या गळ्यावर, पोटावर चाकूचे सपासप घाव घातले. गंभीर जखमी झालेल्या दिनेशला वाचविण्यासाठी किशोर नंदनवार धावले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या दिनेशला मेयोत दाखल करण्यात आले. माहिती कळल्यानंतर शांतीनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी नंदनवार यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्रभर धावपळ करून आरोपी उमरेडकर, भानुसे आणि सोनटक्के या तिघांना अटक केली. चवथा आरोपी नानोटकर फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर